FAIL (the browser should render some flash content, not this).

डंगिरेवाडी यात्रा:


डंगिरेवाडी गावची यात्रा हि चैत्र पौर्णिमेला असते. यात्रा देवी महलक्ष्मिचि असते. यात प्रथम पौर्णिमेच्या रात्री गावातून पालखी निघते. पालखीत देवीचे मुखवटे असतात. हे मुखवटे मोही गावातून दुपारी आणले जातात. रात्री नऊ किव्हा दहाच्या दरम्यान पालखी निघते. सर्व लोक अनवाणी प्रवास करतात.पालखी सुमारे रात्री एक वाजता मोही गावाला पोहचते. हि पालखी मोहीच्या महलक्ष्मि मंदिरात डाव्या बाजूला दर्शनासाठी ठेवण्यात येते. डंगिरेवाडीत पौर्णिमेला सुवासिनी असतात. तसेच मोही गावात पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुवासिनी असतात. (सुवासिनी - नऊ सुवासिनी बायकांना घरी बोलून त्याचं आदरतिथ्य करणे.)

ज्यांनी देवीलाल नवस केलेले असतात ते पूर्ण झाल्यावर देवीला लोटांगण किव्हा दंडस्नान घालतात. देवीस नैवेद्य दिला जातो. पौर्णिमेनंतर तिसऱ्या रात्री सबिना निघतो. बारा वाजता सबिना पाहण्यासाठी लोक फार दूरवरून मोही गावात येतात.

यात प्रत्येक गावाची कावड असते, डंगिरेवाडी गावाची पालखी आणि काही देवर्षी असतात. सर्वांची पूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते. लोक देवास तोरण बांधतात. नारळ आणि पैशाची माळ अर्पण करतात. मुलांना आशीर्वाद मिळावा म्हणून मुलांना पालखीखाली झोपवतात. दुपारी बारा वाजता पालखी मंदिरात येते. सुमारे बारा तास हा सबिना चालतो. त्यानंतर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या आवडत्या अशा कुस्त्यांचा समावेश असतो.

हि यात्रा तीन दिवस चालते. त्याच दिवशी संध्याकाळी डंगिरेवाडी गावची पालखी मोहीतून निघते. रात्री नऊ वाजता पालखी डंगिरेवाडी गावात पोहचते. येथेहि पालखीची मिरवणूक निघते. पालखी गावात येताच प्रथम महादेवाच्या देवळात जाते. तेथूनच ती महालक्ष्मिच्या मंदिरात आणली जाते. मग रात्री साडे नऊ, दहाच्या सुमारास सबिना निघतो. या मिरवणुकीतही पालखीखाली मुलांना झोपवले जाते. रात्री बारा-एक वाजता येथील सबिना संपतो. दुस्र्ता दिवशी पाकळणी साजरी केली जाते. यात संपूर्ण गाव एकत्र येऊन देवीचा नैवेद्य तयार करतो.

वर्षातून एकदाच येते नियमाने ठरली
जमली सगळी गावं बघा जत्रा भरली

रूढी आणि रिती सगळ्या आहेत ठरलेल्या.
आपल्या गावच्या कावडीबी हातामंधी धरलेल्या
सगळ्यात पुढ पालखी असते मानाची
येतेय बघा दौलत डंगिरेवाडी गावाची

देवीच्या घरी पालखी मुक्काम कराया
विविध जीन्नासाच्या नैवेद्य दयाया
जत्रेच्या आधीच थेटर आली पालं लागली
पोर, थोर सीनेमा बघाया उभी ठाकली

जिलेबी आणि मेवा आला दुधाचा खवा
देवळा भोवती सारा गाव झाला जमा
बारा वाजता होते देवीची आरती
मग निघतात कावडी आणि पालखी

कावडी अन मानाची पालखीबी संग
त्याच्या मागे देव सारे हलवतात अंग
साबिण्यात लहानांची मजा थोरांची भक्ती
देवाशिर्वादाने मिळते जीवनात शक्ती

मने जुळवी सगळ्यांना मिळवी अशी हि प्रथा
देवाशी माणसाला जोडणारी आहे जत्रेची गाथा
देवीच्या गाभाऱ्यात लावलाय चांदीचा पत्रा
माणसं जोडायची... मग रोज भरवा जत्रा.....रोज भरवा जत्रा.....