FAIL (the browser should render some flash content, not this).

हर हर महादेव


प्रती शिखर शिंगणापूर (डंगिरेवाडी)

शिखर शिंगणापूर प्रमाणेच डंगिरेवाडी हे गावही इतिहासाचा अमूल्य वारसा असूनही प्रसिद्धीपासून वंचित आहे . या गावाचा इतिहास व आताही येथे पाळली जाणारी शिस्त या गावास प्रति शिंगणापूरचा दर्जा देऊन जाते . या गावातील लोकांची श्री शंभू महादेवावरील श्रद्धा, नितांत भक्ती आणि या गावाचा इतिहास आम्ही या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.डंगिरेवाडी या गावातील स्वयंभू श्री शंभू महादेवाचे मंदिर ,येथील परंपरा ,श्रींच्या पुजेची पद्धत ,येथील शिस्त खरच खूपच वाखाणण्याजोगी आहे . येथील लोकांचा या परंपरेतील सहभाग, त्यांचा उत्साह आणि निस्वार्थ कर्मभाव त्यांना इतरांपेक्षा मोठा करून जातो. अशाच एका सुंदर आणि धार्मिक वारसा लाभलेल्या गावची सफर करूया.