FAIL (the browser should render some flash content, not this).

माननीय आमदार श्री. जयकुमार गोरे यांचा अभिप्रायहर हर महादेव.....


माणसाच्या जीवनात त्याची श्रद्धा आणि त्याचे श्रद्धास्थान यांना अनन्यसाधारण महत्व असते. शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेलं तसेच धार्मिक परंपरेने नटलेले आणि पुरातन काळातील शिल्पकलांची साक्ष देणारं आहे. मुख्य म्हणजे तेथे छत्रपती घराण्याचे ठसे पाहायला मिळतात. राजे शहाजी, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी यांच्या अस्तित्वाच्या खुणा तेथे अजूनही आहेत.

अशा या तीर्थक्षेत्री कोणीही आपलं मागणं घेऊन आला तर तो रिकाम्या हाताने कधीही परत जात नाही. देवाच्या दर्शनानेच मन शांत होऊन जाते आणि आपली झोळी या पवित्र देवस्थानच्या नुसत्या भेटीनेच भरल्यासारखी वाटते. अशा या जागृत देवस्थानाला माझ त्रिवार वंदन.