FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर जवळील इतर तीर्थक्षेत्र


जर आपण शिखर शिंगणापूरला जायच्या तयारीत असाल तर शिखर शिंगणापूर बरोबरच जवळपासची काही धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळेहि आपणास पाहता येतील.

त्यात प्रमुख्याने "श्री चैतन्य महाराज गोंदवले" हे शिखर शिंगणापूर पासून वीस ते पंचवीस किलोमीटर दूर आहे.श्री क्षेत्र गुप्तलिंग शिखर शिंगणापूर पासून तीन किलोमीटर दूर आहे. म्हसवड चे श्री क्षेत्र सिंद्ध नाथ ही शिखर शिंगणापूर पासून चाळीस किलोमीटर दूर आहे. तसेच शिवाजी महाराजांची राजगादी असलेले सातारा शहर शिखर शिंगणापूर पासून सत्तर किलोमीटर दूर आहे. पुसेगावचे सेवागिरी महाराज देवस्थानही जवळच आहे. श्री क्षेत्रपंढरपूर व जेजुरी हि १०० किलोमीटर अंतरावर आहे.

जर तुम्ही स्वत:ची गाडी घेऊन येत असाल तर खालील प्रमाणे देवदर्शन तुम्हास सोयीचे होईल.

पुणे -> जेजुरी -> शिखर शिंगणापूर -> डंगिरेवाडी -> श्री सिद्धनाथ (म्हसवड) -> श्री चैतन्य महाराज (गोंदवले) -> श्री क्षेत्र सेवागिरी (पुसेगाव)

धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे अंतर (किमी) मार्गे
  गुप्तलिंग शिंगणापूर-म्हसवड रस्ता
  डंगिरेवाडी १२ शिंगणापूर-सातारा रस्ता
  गोंदवले २५ शिंगणापूर-सातारा रस्ता
  सिद्ध नाथ - म्हसवड ४० शिंगणापूर-म्हसवड रस्ता
 श्री सेवागिरी महाराज (पुसेगाव) ५० शिंगणापूर-सातारा रस्ता
  सातारा ७० शिंगणापूर-सातारा रस्ता
  जेजुरी १०० शिंगणापूर-पुणे रस्ता
 पंढरपूर १०० शिंगणापूर-सोलापूर रस्ता